पुरुषार्थ



मंडळी आपण बऱ्याचदा बघतो की whats up किंवा Facebook वर महिलांवर असंख्य जोक होतात… आणि पुरुषांकडून ते चवीने share सुद्धा केले जातात.…….  नाही….  नाही……  मी काही त्या बद्दल आंदोलन करूयात असं म्हणत नाहीये…….  निखळ विनोद आम्हाला सुद्धा आवडतात हो…….  पण महिलांचे कोणतेही सण/ उपवास आले की हमखास त्यांची खिल्ली उडवणारे जोक्स फिरत राहतात ते बघून वाईट वाटतं …….  आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप….  बघा……  वाचा आणि विचार करा खरा पुरुषार्थ कशात आहे तिच्यावर हसण्यात कि तिला समजून घेण्यात……. 


ती हळदी कुंकू करते
...सौभाग्य जपण्यासाठी !
...ती देवीची 'ओटी' भरते
...मातृत्व जपण्यासाठी !
...ती घट बसवते
...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी !
...ती हरतालिका पूजते
...सुखी संसारासाठी !
...ती वड पूजते
...पती प्रेमासाठी !


...कोणतं व्रत करते
...ती स्वतःसाठी ?
मग तरीही तिची थट्टा ?
...कशासाठी ?
पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ?
...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर !
टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना !
आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे येऊ नकोस !
आज बाई येणार नाही म्हणून काय झालं, मी फरशी पुसतो, बाकीचं मात्र तू बघ !
ए चल, आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ !
...नसेल जमत मला बायकोला 'आय लव्ह यू' म्हणायला, पण कधी ते डोळ्यांच्या भाषेत तरी मी बोललोय का ?

'स्त्री'च्या "बायको"पणाची थट्टा म्हणजे पुरुषार्थ नव्हे,

तर 'बायको'मधल्या "स्त्री"चा सन्मान हा खरा पुरुषार्थ आहे !





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाती....

ओंजळीतली फुले

वांग्याचं भरीत