पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगणे (प्रा) अनलिमिटेड !

इमेज
प्रत्येकाने वाचवा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख!  दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.) माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली. पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’ ‘प्रचंड. रीडि

लग्न करताय??? मग हे नक्की वाचा!!!

इमेज
मध्यंतरी माझ्या वाचनात एक सुंदर लेख आला होता. लेखकाचं नाव माहित नाही पण हा लेख नक्कीच आवडेल तुम्हांला… लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचावा आणि कुठेतरी संभाळून सेव्ह ही करून ठेवावा; परत वाचण्यासाठी! ‘बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी’ अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने ‘गृहकृत्यदक्ष’ आणि ‘आदर्श सून’ असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा; एक आढावा: - उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे. - ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल. - तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील, - तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं. - तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पर्ध

ह्या बायकांच्या मनात नक्की चाललंय तरी काय????

इमेज
  असं  म्हणतात की  बायकांच्या मनात काय चाललंय हे कधीच ओळखता येत नाही. बाईच्या मनाला ३६ कड्या अन ३६ कुलुपं, प्रत्येकीची वेदना वेगळी अन प्रत्येकीचा हुंदका वेगळा. असे कितीतरी हुंदके रोज उरातल्या उरत दबून जात असतील देव जाणे.       कुठे लग्न झालेल्या नव्या नवरीची घुसमट तर कुठे तरुणपणीच विधवा झालेल्या स्त्री च्या यातना. कुठे प्रोढ कुमारिकांचा कोंडमारा तर कुठे जोर जबरदस्ती. या सगळ्यांना आपली होणारी भावनिक आणि शारीरिक घुसमट कधीच व्यक्त करता येत नाही, किंबहुना आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना इतकं  गृहीत धरलं  जातं ना की  या सगळ्या गोष्टींची साधी दखल सुद्धा कोणाला घ्यावीशी वाटत नाही.        खरंच, बाईच्या मनात काय चाललाय हे पुरुषांना थोडं  जरी कळलं  ना  तरी बाईचा जन्म कितीतरी सुखकर होईल. कारण आपल्या भारतासारख्या पुरुषप्रधान आणि संस्कृती जपणाऱ्या देशात अजूनही स्त्रीला आपल्या सगळ्या भावना व्यक्त करता येत नाहीत आणि कोणी व्यक्त होण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर अनैतिकतेचा ठपका ठेऊन आपण मोकळे होतो. कारण  या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीत बसत नाहीत.           पण, संकृती संस्कृती म्हणजे तरी क

तू ....

इमेज
खूप  वेळ  झाला  तरी  कागद  रिकामाच  होता.…  मनात  असंख्य  विचार  गर्दी  करत  होते  पण  हाताला  काहीच  लागत  नव्हत. जणू  शिवा  शिवीचा  खेळच   खेळत  होते  माझ्यासोबत...... शेवटी  ठरवल डोळे  बंद  करून  जे  काही  समोर येईल  त्यावर  लिहायला  सुरवात  करायची..... मग  काय  नेहमी  प्रमाणे  तूच  जिंकलास. आजही  माझ्या  डोळ्या  संमोर  तूच  आलास . मन  पुन्हा  एकदा  तुझ्यात  हरवू  लागल. मी नाही नाही म्हणत असतांना देखील बेलगामपणे पुन्हा पुन्हा तुझाच पाठलाग करू लागलं.                     आज  काल अस  काय  झालाय  की  माझ्या  मनात तुझ्याशिवाय  दुसर  कोणी  येतच  नाही  फक्त तू  तू  आणि  तू....... तू  माझा  नक्की  कोण  आहेस  याच  उत्तर  मला  अजून  उमगलेल नाही. मला  फक्त  एवढंच  माहितीये  मला  तुझ्यासोबत  जगायचय.... आयुष्याचा  प्रत्येक  क्षण  तुझ्यासोबत  घालवायचाय . तुझ्यात  आणि  तुझ्या  प्रेमात  मला  चिंब  भिजायचं, मला  तुझ्यात  हरवून  जायचंय..... तू  म्हणजे  मला  पडलेल  सगळ्यात  सुंदर  स्वप्न. तू  म्हणजे  माझ्या  मनाला  व्यापून  टाकणारी  एक  सुंदर  संध्याकाळ . कस  सांगू  तुला  कि  तुझ  माझं   असण