ओंजळीतली फुले



(स्थळ: मध्यमवर्गीय घराचा दिवाणखाना.)

(आपल मुख्य पात्र अप्पासाहेब मांगलवाडीकर उद्विग्न मनस्थितीत मुलीची वाट बघत येरझाऱ्या घालत आहेत. …. तेवढ्यात साधारण तिशीतली त्यांची मुलगी निशा घाम पुसत हातातल्या मोबाईल मध्ये डोक घालत घरात प्रवेशाती होते. )

अप्पा: (लगबगीने ) चिऊSSS  आलीस बेटा… अग किती वाट बघायची तुझी…. किती उशीर ग आणि मी शेजारच्या दामू ला धाडला होता तुला न्यायला तो नाही दिसत कुठे??? आणि घाम किती आलाय तुला…बस तू पहिले इथे अशी बस पाहू… हे धर पाणी पी वाळा घातलेलं थंड… अग उन्हाळ्याच जरा टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडाव बाळ, अस उन्हात…

निशा: ( त्यांच बोलणं मधेच तोडत, इतका वेळ मोबाईल मध्ये घातलेलं डोक वर काढून) ओह्ह चील अप्पा. मी ओके आहे तुम्ही उगाच इतकं प्यानिक होऊ नका. (थोडं थांबून) ह्म्म्म तुमचा दामू का कोण मला नाई भेटला आणि मी लहान आहे का आता मला कोणी घ्यायला पाठवायला. 

(तेवढ्यात निशाचा मोबाईल वाजतो)

निशा:  yes baby…. हो रे मी आत्ताच पोहोचली… हो हो अप्पा व्यवस्थित आहेत अरे…… honey मी म्हटलं नं मी बोलते त्यांच्याशी म्हणून…give me some time ना…. करते फोन… बाय… love you too sweetheart 

अप्पा: ( जरा घुश्यातच) अग बाप समोर बसलाय याची तरी थोडी लाज बाळग. मी इथे समोर असताना अशी बोलतेस मग तिकडे पुण्याला तर आमच्या अब्रूचे… छे छे…. मला बोलवणार देखील नाही… (कानावर हात ठेऊन) राम कृष्ण हरी… सोडव रे बाबा पांडुरंगा…. 

निशा: अप्पा plz तुम्ही उगाच overreact होऊ नका आणि मी तुमचा आदर करते म्हणूनच तर तुमची रीतसर परवानगी मागतेय नं. 

अप्पा: (रागात) अग कार्टे तोंड वर करून अशी बोलतेस जशी लग्नाची परवानगी मागायला आलीयेस. अग त्याचं गण-गोत, जात-पात कसलाच म्हणून विचार न करता लग्नाला परवानगी दिली असती गं मी पण हे अस लग्नाआधी एकत्र राहायचं म्हणजे… (पुन्हा कानावर हात ठेऊन) शिव शिव शिव …. पांडुरंगा अरे आई विना पोर वाढवली मी ते  हा दिवस बघण्यासाठी का रे बाबा… (मोठा सुस्कारा सोडतात)

निशा: अप्पा तुम्ही प्रत्येक गोष्ट इतकी negative का घेता हो प्रत्येक वेळी. तुम्ही तर असे बोलता जस मी तोंड काळ करून आलीये. तसही तोंड काळ करण्याची तुमची अशी वेगळीच व्याख्या असणार म्हणा. असो. मला फक्त इतकच म्हणायचय की तुम्ही थोड समजून घ्या न आमच्या पिढीला. आम्ही लग्न करायला नाही म्हणतोय का फक्त अभी चे आई बाबा  अमेरिकेहून येई पर्यंत सहा महिने एकत्र राहतो म्हणतोय. तुम्हाला तर कौतुक करायला हव मी अस विचारून वैगरे करतेय सगळ माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर आत्तापर्यंत सगळं करून …. 

अप्पा: चिऊ…. अग तुझ्या जिभेला काही हाड… कोणासमोर काय बोलाव याची काही भीड मर्यादा आहे की  नाही… पोटची पोर हे हे अस ऐकवेल…. तेही बापाला…. तो पांडुरंग पण आज कानावर हात ठेऊन बसला असेल 

निशा: for god sake सारख सारख कानाला हात लाऊन पांडुरंग पांडुरंग म्हणणं बंद करा. तुम्हाला काय वाटत हो वाया  गेलीये तुमची मुलगी. इथे गावात बसून तुम्हाला काय कळणार म्हणा जग कुठे चाललंय. आणि तुमच्याशी नाही तर कोणाशी बोलू हो मी हे सगळ, आई तर नकळत्या वयात सोडून देवाघरी गेली आणि तुम्ही वडिलांची सगळी कर्तव्य पार पडलीत तरी स्वताच्या तत्वांपायी माझ्याशी अंतर ठेऊनच वागलात. एका उमलत्या मुलीच्या भावना, तिला पडणारे प्रश्न, अडचणी तुम्ही कधी समजूच शकला नाहीत. (पॉझ घेते) जे झाल ते झाल पण आता मी मोठी झालीये स्वताचे निर्णय स्वतः घेण्याची कुवत आहे माझ्यात आणि धमकही. तरीसुद्धा तुम्हाला विचारायला आलीये मी अप्पा. हे तुमच्यासाठी खूप नाहीये का???

अप्पा: (डोळ्यात पाणी आणि हतबल) होय हो…. बरोबर आहे तुझ…. मी तुझ्यासाठी काहीच केल नाही… तुझी आई गेली तेव्हा अवघा तिशीत होतो मी. मला भावना नव्हत्या??? मला एकटेपणा नव्हता??? पण केवळ तुला…  माझ्या चीउला सावत्र असं काही नको म्हणून मीच तुझी आई व्हायचं ठरवल. आता ते माझ्याच्यानी जमलं नाही ती गोष्ट वेगळी पण हा पांडुरंग साक्षी आहे मी माझ आतड-कातडं झिजवून दिवसाची रात्र करून तुला जपल ग चिऊ… आपलं हे छोट घरट सोडून तू उंच आकाशात भरारी मारायची ठरवलीस तेव्हाही मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो… पण… पण आता तू मोठी झालीस… इथे बसून मला तुमचं जग काय ते कळणार… मी तुमच्या लेखी अडाणी अशिक्षित… काय ते तुमच्या भाषेत outdated… manager मिस निशा मांगलवाडीकर तुम्ही जा तुम्हाला जस पटेल तस वागा… हा थेरडा तुमच्या मध्ये यायचा नाही… (रडतं) तुमच्या मध्ये यायचा नाही… 

निशा: ( डोळ्यात पाणी आणून त्यांच्या जवळ जाते पायाला धरून खाली बसते) अप्पा अप्पा plz तुम्ही अस रडू नका. plz try to understand मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं हो. पण तुम्ही थोड समजून घ्या आम्हाला मी तिथे एकटी राहते अप्पा. office मध्ये, बाहेर एका सिंगल मुलीला काय काय सहन कराव लागतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला हवंय का अप्पा आणि आम्ही दोघाही स्वताच्या कामात इतके बुडून गेलो आहोत न कि एकमेकांना साधा धड वेळाही देत येत नाही. मग उगाच भांडण चीड चीड म्हणून मग अभी ने एकत्र राहण्याचा पर्याय सुचवला. अप्पा आम्हाला लग्न बंधन नाही वाटत हो पण लग्न व्हायच्या आधीच या सहा महिन्यात उगाच आमची भांडण विकोपाला जाऊन काही अघटीत घडू नये. अप्पा we want to save our relationship अप्पा पण तुम्हाला दुखावून नाही… कधीच नाही (अप्पांच्या मांडीवर डोक ठेऊन रडत राहते). 

अप्पा: (थोड्यावेळाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत) चिऊ अग बाळा. केवळ तत्वांसाठी तो पांडुरंग देखील आपल्या लेकरांना पोरकं करत नाही गं. मग मी तरी तुला कसा बर दूर लोटू.लिव्ह इन म्हणजे काहीतरी पाप या मताचा नाही ग मी. मला तुझी तगमग कळत का नाही. इथे बसून देखील सगळे उमगते हो मला. तुमची आत्ताची पिढी मोबाईल आणि कॉम्पुटर मध्ये रंगलेली. त्यामुळे तुम्हाला समोरच्याची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. उठला का बसला का खाल्ल का पिल्लं का सगळ्या चौकश्या तुम्ही दिवसभर करत राहणार. अग़ प्रेम म्हणजे तुम्ही समोरच्यावर नजर ठेवण्याची आणि सतत 'कीप इन टच' राहायची केविलवाणी धडपड करत राहता ग. नात जपायचं न चिऊ तर समोरच्यावर विश्वास हवा बाळा. दिवसभर कामात राहून रात्री फक्त एकत्र येण्याने प्रेम टिकत नाही ग मिळतो तो फक्त शारीरिक सहवास. प्रेम फुलवाव लागतं समोरच्याला विश्वास देऊन त्याला त्याची अशी मोकळीक देऊन.….  तुमच्या पिढीला न घाई झालीये सगळ्या गोष्टींची….  जरा धीर म्हणून नाहीच. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते बेटा त्या आधीच ती करून त्याची गम्मत हरवु नका ग. नाहीतर नातं टिकवणं अजून कठीण होईल बाळ. बाकी…  जशी त्या पांडुरंगाची इच्छा. 

निशा: पण मग मी आत्ता काय कराव अप्पा. मला काहीच सुचत नाहीये. मला अभिला गमवायच नाहीये अप्पा पण तो म्हणतो त्याच्या आई वडिलांना त्याच साग्रसंगीत लग्न लाऊन द्यायचय आणि ते यायला अजून ६ महिने अवकाश आहे. मी… मी गेले ५ वर्ष थांबली हो अप्पा पण आता नाही हि ओढाताण झेपत. मी काय करू तुम्हीच सांगा. 

अप्पा: अस बघ बाळा. तसा एक उपाय आहे माझ्याकडे बघा तुम्हाला पटतोय का. तुम्ही आत्ता  register लग्न करा आणि मग जावई बापूंचे आई वडील आले कि करा साग्रसंगीत लग्न. 

निशा: हं अस काहीतरी करता येईल. (जरास लाजून) आणि जावईबापू वैगरे काय हो अप्पा. तुमचं आपलं काहीतरीच. 

अप्पा: अग मग काय म्हणु आमच्या चिऊ ताईचा चिमणा ( हसत हसत निशाला जवळ घेतात). चिऊताई एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा….  प्रेम म्हणजे 'एक क्षण भाळण्याचा बाकी सांभाळण्याचा'. 

(पडदा पडतो) 

समाप्त. 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाती....

वांग्याचं भरीत