पोस्ट्स

मे, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाती....

इमेज
 कधी  कधी  काही  नाती  तोडायची  म्हटली तरी तुटत नाहीत. नात्याचे संदर्भ बदलत जातात मात्र नाती अबाधित राहतात. मग, हळू हळू मनाला होणाऱ्या  संवेदना ही बोथट होत जातात. समोरच्या मनाची आपल्या मनाला असलेली ओळख बदलत जाते आणि ती चांगली वाईट या कक्षां पलीकडे जाऊन एक नवीन नात तयार होत. ज्या नात्यात चांगले-वाईट , राग रुसवा, वेदना अशी कोणतीच परिमाण नसतात, कोणतीही गुंतागुंत नसते असतो फक्त आनंद "निर्मळ आनंद" जो त्याच्याशी बोलून मनाला मिळतो आणि आता सगळ काही ठीक आहे अशी (खोटी) समजूत मनाला घालतो. आपल मन सुधा काही झालच नाही अश्या थाटात वावरत आणि राहते फक्त सरळ साधी नात्यांची गुंफण.