पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वांग्याचं भरीत

इमेज
नमस्कार मंडळी…. कधी कधी एखाद्या छोट्या गोष्टीला पण आपण असे react होतो नं कि अगदी होत्याच नव्हतं होऊन जात.  आता मला सांगा वांग्याचं भरीत कोणाचं ठरलेलं लग्न मोडू शकतं का हो????  बघा तुम्हीच… मिनू…अग मीने उठतेस नं???  आज किनई मी खास जावईबापू साठी वांग्याची भरीत केलंय त्यांना आवडतं न माझ्या हातचं.मागच्या वेळी केलेलं तेव्हा म्हणत होते आई पुन्हा करून पाठवा.... लाखात एक जावई आहे हो माझा… आता तू लवकर उठ आणि दे त्यांना हे भरीत….   हो ग आई सकाळी सकाळी काय भरीत भरीत चालवलंय बघीन मी फोन करून. श्या... आज रविवार चा पार मूड घालवला राव आईने 'वांग्याचं भरीत आणि भाकरी' हा काय मेनू आहे का 😓😓  मला अजिबात आवडत नाही वांग माहित आहे तिला.....  पण माझ लग्न ठरल्या पासून माझी आवड निवड विचारात घेताय कोण…….  आई ला नुसतं होणाऱ्या जावयाच कौतुक.….   जाऊ देत मी आपलं फोन करते नवऱ्याला तेवढाच तो खुश. (सर बॉडी एवढी खराब झालीये ओळख पण पटणार नाही.) अरे हो पण पंचनामा तर करायला पायजे ना.….  साली काय कटकट आहे नाईट संपवून घरी जाऊन आराम करू म्हटलं तर रविवारी सकाळी सकाळी ही बॉडी सापडली.….  असो आलिया भोगासी… आह

पुरुषार्थ

मंडळी आपण बऱ्याचदा बघतो की whats up किंवा Facebook वर महिलांवर असंख्य जोक होतात… आणि पुरुषांकडून ते चवीने share सुद्धा केले जातात.…….  नाही….  नाही……  मी काही त्या बद्दल आंदोलन करूयात असं म्हणत नाहीये…….  निखळ विनोद आम्हाला सुद्धा आवडतात हो…….  पण महिलांचे कोणतेही सण/ उपवास आले की हमखास त्यांची खिल्ली उडवणारे जोक्स फिरत राहतात ते बघून वाईट वाटतं …….  आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप….  बघा……  वाचा आणि विचार करा खरा पुरुषार्थ कशात आहे तिच्यावर हसण्यात कि तिला समजून घेण्यात…….  ती हळदी कुंकू करते ...सौभाग्य जपण्यासाठी ! ...ती देवीची 'ओटी' भरते ...मातृत्व जपण्यासाठी ! ...ती घट बसवते ...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी ! ...ती हरतालिका पूजते ...सुखी संसारासाठी ! ...ती वड पूजते ...पती प्रेमासाठी ! ...कोणतं व्रत करते ...ती स्वतःसाठी ? मग तरीही तिची थट्टा ? ...कशासाठी ? पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ? ...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर ! टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना ! आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे य

पदर

इमेज
पदर... काय जादुई शब्द आहे हो मराठीतला!  काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण, केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात! किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर-दीड मीटर लांबीचा भाग. तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखीही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा! या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन "अमृत‘ प्राशन करण्याचा हक्क बजावतं.  जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदरच पुढं करते. मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टॉवेलऐवजी आईचा पदरच शोधतं आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा

तुला माझ्याबद्दल काय वाटतं???

इमेज
लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... "तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?" तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... ! प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ... पण मग लग्न झालं ... संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ... आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ... त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती .. हातात लाटणं ... समोर तापलेला तवा ... त्यानं संभाव्य धोका ओळखला .. आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .. संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...' असं म्हणून तो कामावर सटकला ... ! तो घरातून बाहेर पडला खरा ... पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. ! अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ... कठीण असतं हो ... नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं .. तो विचार करत होता .. काय सांगावं .. ? मी राजा .. तू माझी राणी वगैरे काह