पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लग्न करताय??? मग हे नक्की वाचा!!!

इमेज
मध्यंतरी माझ्या वाचनात एक सुंदर लेख आला होता. लेखकाचं नाव माहित नाही पण हा लेख नक्कीच आवडेल तुम्हांला… लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचावा आणि कुठेतरी संभाळून सेव्ह ही करून ठेवावा; परत वाचण्यासाठी! ‘बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी’ अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने ‘गृहकृत्यदक्ष’ आणि ‘आदर्श सून’ असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा; एक आढावा: - उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे. - ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल. - तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील, - तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं. - तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पर्ध

ह्या बायकांच्या मनात नक्की चाललंय तरी काय????

इमेज
  असं  म्हणतात की  बायकांच्या मनात काय चाललंय हे कधीच ओळखता येत नाही. बाईच्या मनाला ३६ कड्या अन ३६ कुलुपं, प्रत्येकीची वेदना वेगळी अन प्रत्येकीचा हुंदका वेगळा. असे कितीतरी हुंदके रोज उरातल्या उरत दबून जात असतील देव जाणे.       कुठे लग्न झालेल्या नव्या नवरीची घुसमट तर कुठे तरुणपणीच विधवा झालेल्या स्त्री च्या यातना. कुठे प्रोढ कुमारिकांचा कोंडमारा तर कुठे जोर जबरदस्ती. या सगळ्यांना आपली होणारी भावनिक आणि शारीरिक घुसमट कधीच व्यक्त करता येत नाही, किंबहुना आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना इतकं  गृहीत धरलं  जातं ना की  या सगळ्या गोष्टींची साधी दखल सुद्धा कोणाला घ्यावीशी वाटत नाही.        खरंच, बाईच्या मनात काय चाललाय हे पुरुषांना थोडं  जरी कळलं  ना  तरी बाईचा जन्म कितीतरी सुखकर होईल. कारण आपल्या भारतासारख्या पुरुषप्रधान आणि संस्कृती जपणाऱ्या देशात अजूनही स्त्रीला आपल्या सगळ्या भावना व्यक्त करता येत नाहीत आणि कोणी व्यक्त होण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर अनैतिकतेचा ठपका ठेऊन आपण मोकळे होतो. कारण  या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीत बसत नाहीत.           पण, संकृती संस्कृती म्हणजे तरी क