'मेहरुनी'...
मुं बई सारख्या सतत धावणाऱ्या शहरात घडणारी एक छोटीशी तरी आपल्या हृदयाचा ठाव घेणारी प्रेमकहाणी. अंधेरी स्टेशन....वेळ सकाळची.... कामावर जाणाऱ्या लोकांची नेहमीची धावपळ चाललेली...त्या सगळ्या गडबडीत उभे असलेले 'ते' दोघ. 'तो' तसा सर्वसाधारण दिसणारा पण फक्त तिच्यासाठी खूप खास असणारा....गाडी यायची तशी ती त्याला bag अडकवून द्यायची आणि त्याचा हात धरून गाडीत चढायची... त्यांचा प्रवास सुरु व्हायचा...आणि ती त्याच्यासाठी स्वेटर विणायला घ्यायची....दिवस, महिने जायचे, स्वेटर आकार घेत जायचं...आणि अचानक एक दिवस ते दोघ दिसेनासे होतात...खूप दिवसांनी तो दिसतो पण एकटाच....कावरा बावरा...जणू कोणाला तरी शोधात असलेला...काय होत तीचं....मेहरुनी.........