पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'मेहरुनी'...

इमेज
मुं बई सारख्या सतत धावणाऱ्या शहरात घडणारी एक छोटीशी तरी आपल्या हृदयाचा ठाव घेणारी प्रेमकहाणी. अंधेरी स्टेशन....वेळ सकाळची.... कामावर जाणाऱ्या लोकांची नेहमीची धावपळ चाललेली...त्या सगळ्या गडबडीत उभे असलेले 'ते' दोघ. 'तो' तसा सर्वसाधारण दिसणारा पण फक्त तिच्यासाठी खूप खास असणारा....गाडी यायची तशी  ती  त्याला bag  अडकवून द्यायची आणि  त्याचा हात धरून गाडीत चढायची... त्यांचा प्रवास सुरु व्हायचा...आणि ती त्याच्यासाठी स्वेटर विणायला घ्यायची....दिवस, महिने जायचे, स्वेटर आकार घेत जायचं...आणि अचानक एक दिवस  ते दोघ दिसेनासे होतात...खूप दिवसांनी तो दिसतो पण एकटाच....कावरा बावरा...जणू कोणाला तरी शोधात असलेला...काय होत तीचं....मेहरुनी.........

पाऊस आणि तो....

इमेज
बाहेर आभाळ भरून आलय आणि मी नेहमीप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट बघतेय. पाऊस तसा दरवर्षीच येतो पण तरीही मला नेहमी वेगळा वाटतो, आपला वाटतो आणि  नवीन वाटतो अगदी त्याच्या सारखा.....पाउस आणि ' तो ' दोघही मला नेहमी सारखेच वाटतात.' तो ' ही अगदी असाच पावसासारखा अल्लड , उनाड. यावा यावा वाटत असतांनाच चकवणारा आणि कधी अचानक येऊन चिंब भिजवुन जाणारा........ असाच कधी पाउस येतो आणि पावसाची सर अलगद माझ्या अंगावर कोसळताना सोबत त्याच्या आठवणी हि घेऊन येते......... आणि प्रत्येक थेंबा  सोबत मी त्याच्या आठवणीत खोलवर बुडत जाते. अन, माझ्या मनात नकळत कवितेचे बोल रेंगाळू लागतात आता पुन्हा पाऊस येणार.... आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाश  काळ नीळ होणार, मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार, मग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....