तू ....
खूप वेळ झाला तरी कागद रिकामाच होता.… मनात असंख्य विचार गर्दी करत होते पण हाताला काहीच लागत नव्हत. जणू शिवा शिवीचा खेळच खेळत होते माझ्यासोबत...... शेवटी ठरवल डोळे बंद करून जे काही समोर येईल त्यावर लिहायला सुरवात करायची..... मग काय नेहमी प्रमाणे तूच जिंकलास. आजही माझ्या डोळ्या संमोर तूच आलास . मन पुन्हा एकदा तुझ्यात हरवू लागल. मी नाही नाही म्हणत असतांना देखील बेलगामपणे पुन्हा पुन्हा तुझाच पाठलाग करू लागलं. आज काल अस काय झालाय की माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसर कोणी येतच नाही फक्त तू तू आणि तू....... तू ...